कल्याणकारी योजना

संस्थेतर्फे सभासद व त्यांच्या कुटुंबीयांकरिता राबविण्यात येणा-या विविध कल्याणकारी योजना.


१. सेवा सहकार निधी :-

सभासदाचे निधन झाल्यास, संस्थेच्या खाती नोंद असलेल्या सभासदाच्या कायदेशीर वारसदारास संस्थेतर्फे रुपये १ लाख सेवा सहकार निधी अंतर्गत मदत देण्यात येते. याकरिता सभासदांना आवाहन करण्यात येते की, त्यांनी वारसदाराची नोंद संस्थेच्या दफ्तरी करावी.


२. मानसिक विकलांग पाल्यासाठी मदत :-

सभासदांच्या मानसिक दृष्ट्या विकलांग असलेल्या पाल्यांच्या पालनपोषणास मदत व्हावी या उद्देशाने दरमहा रुपये ५००/- इतकी आर्थिक मदत परस्पर सभासदाच्या बँक खात्यात जमा करण्यात येते.


३. वैद्यकीय मदत :-

बेस्ट उपक्रमाकडून सभासदांची नामंजूर करण्यात आलेल्या वैद्यकीय बिलांचा परतावा त्यांच्या आजाराचे स्वरूप लक्षात घेऊन जास्तीत जास्त रुपये ५०००/- इतकी मदत संस्थेतर्फे करण्यात येते.


४. कर्करोगग्रस्त सभासद मदत :-

बेस्ट उपक्रमात सेवेत असताना जे सभासद कर्करोग आजाराने पिडीत होतात, अशा सभासदांच्या बँक खात्यात जास्तीत जास्त रुपये २५,०००/- एवढी रक्कम संस्थेतर्फे जमा करण्यात येते.


५. सभासद पाल्यांचा सत्कार :-

संस्थेतर्फे दरवर्षी दहावी / बारावी / पदवी / पदविका परीक्षेत विशेष प्राविण्य मिळविलेल्या सभासदांच्या गुणवंत पाल्यांचा भेटवस्तू व प्रशस्तीपत्र देऊन गौरव करण्यात येतो.


६. दिनदर्शिका / दैनंदिनी :-

संस्थेतर्फे दरवर्षी सभासदांना नवीन वर्षाची दिनदर्शिका / दैनंदिनी वाटप करण्यात येते.


७. ग्रुप मेडिक्लेम पॉलिसी :-

संस्थेतर्फे सभासद व त्यांच्या कुटुंबियांकरीता अल्प दरात ग्रुप मेडिक्लेम सुविधा सुरु करण्यात आलेली आहे.


८. कोव्हीड-१९ मदत :-

बेस्ट उपक्रमात सेवेत असताना कोव्हीड-१९ या आजाराने सभासदाचे निधन झाल्यास सभासदाच्या कायदेशीर वारसास रुपये १ लाखाची कोव्हीड-१९ अंर्तगत मदत देण्यात येते.


९. कुटुंब नियोजन प्रोस्ताहन योजना :-

एका अपत्यानंतर ज्याचे वय ४० च्या आत आहे, अशा सभासदाने स्वत: कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया केल्यास संस्थेच्या नियमानुसार रू.५०००/- चे राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र भेट स्वरूपात देण्यात येते.

१०. सेवा निवृत्त सभासद भेट योजना :-

बेस्ट उपक्रमातून सेवानिवृत्त झालेल्या आणि संस्थेचे किमान दहा वर्ष किंवा अधिक सभासदत्व पूर्ण केलेल्या सभासदांना, संस्थेशी असलेले ऋणानुबंध कायम राहावेत या उद्देशाने संस्थेतर्फे रुपये ५०००/- एवढी रक्कम सेवा निवृत्त सभासद भेट योजने अंतर्गत देण्यात येते.