सुरक्षित कर्ज निधी
१. संस्थेकडून सर्व साधारण कर्ज योजने अंतर्गत घेतलेल्या सर्व प्रकारच्या किमान रु.१,००,०००/- ते कमाल ३,००,०००/- पर्यंतच्या कर्ज रक्कमेसाठी सदर योजना लागू राहील.
२. बेस्ट उपक्रमाच्या सेवेत असताना सभासद मयत झाल्यास व सदर योजने अंतर्गत मंजूर कर्ज रक्कमेतून निधी कपात करून दिला असल्यास, अशा मयत सभासदास त्या कर्जाच्या शिल्लक कर्ज रक्कमेसाठी सदर सुरक्षित कर्ज योजना लागू राहील.
३. सदर सुरक्षित कर्ज मर्यादा कमाल रुपये ५,००,०००/- (रुपये पाच लाख मात्र) पर्यंत राहील.
४. कोणत्याही कारणाने सदर कर्ज निरंक झाल्यानंतर या योजने अंतर्गत कपात केलेल्या रक्कमेचा परतावा परत मिळणार नाही.
५. सेवेत असताना सदर कर्ज निरंक होईपर्यंत सदर योजनेच्या लाभास कर्जदार पात्र राहील.
६. कर्ज घेतेवेळी ज्या मंजूर कर्जातून सदर निधीसाठी कपात करण्यात आलेली असेल, असे कर्ज प्रकरण सभासदाच्या मयत दिनांकापर्यंत किमान शिल्लक कर्ज मुद्दल रक्कमेसाठी या योजनेचा लाभ मिळण्यास पात्र असेल. मात्र कमाल मर्यादा ५ लाख पेक्षा जास्त राहणार नाही.
७. मयत कर्जदार सभासदाच्या मृत्यूचा दाखला त्याच्या नोंदणीकृत वारसदारांनी संस्थेकडे सादर करणे आवश्यक राहील.
८. याकरीता सभासदांना आवाहन करण्यात येते की, त्यांनी आपल्या वारसदारांची नोंद संस्थेत करणे आवश्यक आहे.