विश्राम गृह


लोणावळा विश्राम गृह :-

शहरातील रोजच्या धावपळीच्या, दगदगीच्या जीवनातून काही क्षण मुक्त होऊया...!
आपल्या कुटुंबासोबत, मित्रपरिवारा सोबत आल्हाददायक क्षणांचा आनंद घेऊया.......!!
मुंबई पासून ९५ कि.मी. व पुण्यापासून ६३ कि.मी.....केवळ दीड ते दोन तासाच्या अंतरावर असलेले....सह्याद्री पर्वत रांगांचे दर्शन घडविणारे....छत्रपती शिवाजी महाराज्यांच्या मावळ्यांची शौर्यभूमी....निसर्गरम्य प्रसन्न वातावरण व थंड हवेच्या ठिकाणी....लोणावळा - वळवण येथील पर्यटन स्थळी, संस्थेच्या स्वमालकीचे “सुखवानी व्हिलाज” प्रकल्पातील....नारायणी धाम जवळ.....सुसज्ज असे सहा बंगले असलेले “विश्राम गृह” दिनांक ०२ जुलै २०२१ पासून सभासद व त्यांच्या कुटुंबियांकरिता उपलब्ध करून देण्यात आले आहेत.


विश्रामगृहातील सुविधा :

 प्रत्येक बंगल्यात तीन मास्टर बेडरूम, एक कॉमन हॉल, बाल्कनी, किचन, स्वतंत्र ड्रायव्हर रूम.
 सर्व रूममध्ये पंखे, A.C., केबल टी.व्ही व किचनमध्ये डबल डोअर फ्रीज, अंतर्गत टेलीफोन सुविधा.
 बेड-शीट, पिलो कव्हर, ब्लॅंकेट उपलब्ध.
 एका बंगल्यात पंधरा व्यक्तीना राहण्याची उत्तम सोय.
 गार्डन व पार्किंग सुविधा.


आरक्षण :

 संस्थेच्या सर्व शाखांमध्ये नोंदणी अर्ज उपलब्ध राहतील, मात्र आरक्षण नोंदणी दादर येथील कार्यालयात करावी लागेल
 संस्थेचे नियमित सभासद / सन २०१६ पासून सेवा निवृत्त झालेले सभासद / पतपेढी सेवकवर्ग स्वतः व सहकुटुंब आरक्षण करू शकतील.
 आरक्षण ग्रुपसाठी केले असल्यास व ग्रुपमधील सदस्य हे बेस्ट उपक्रमातील सेवकवर्ग असल्यास त्या ग्रुपला प्रथम प्राधान्य देण्यात येईल
 वास्तव्याचा कालावधी सायं. ०४.०० ते दुसऱ्या दिवशी दुपारी ३.०० याप्रमाणे राहील.


शुल्क आकारणी :

 कमाल ०४ व्यक्तींसाठी एक मास्टर बेडरूम.... प्रती दिन रुपये २०००/-*
 कमाल १५ व्यक्तींसाठी एक संपूर्ण बंगला .... प्रती दिन रुपये ३०००/-*
 अधिक व्यक्तींसाठी (प्रत्येकी) .... प्रती दिन रुपये ३००/-*
*अधिक लागू असल्याप्रमाणे G.S.T. रक्कम आकारण्यात येईल. (सद्या हा दर १८% आहे.)
*अधिक रुपये १०००/- परतावा अनामत रक्कम.
*उपरोक्त शुल्कामध्ये चहा, नास्ता व जेवण हा खर्च समाविष्ठ नाही.


प्रेक्षणीय स्थळे :

 नारायणी धाम
 वॅक्स म्युझियम
 भुशी व वळवण डॅम सोबत घोडा व उंट सफारी
 कार्ला लेणी, आई एकविरा देवी मंदिर, टायगर पॉईंट
 गणेश मंदिर, स्वामी समर्थ मंदिर
 राजमाची किल्ला, लोहगड किल्ला, पवना लेक
 पावसाळ्यात मनमोहून टाकणारे अनेक सुरक्षीत असे “पाण्याचे धबधबे”
***अधिक माहितीसाठी कृपया संस्थेच्या दादर शाखेत प्रत्यक्ष संपर्क करणे.....